🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

माजी विद्यार्थ्यांनी दिले शाळेला जनरेटर मशीन भेट 

कोलाड : प्रतिनिधी

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून २००७ - ०८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी संत नामदेव माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे स्नेह मेळाव्या अंतर्गत आपण शाळेसाठी काहीतरी आठवण भेट द्यावी. या भावनेने सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी नवीन जनरेटर मशीनची भेट दिली. 

या कार्यक्रमाप्रसंगी २००७-०८ विद्यार्थी निखिल कोंडे, केतन शिंदे, शितल भणगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेतील जुन्या आठवणीने भाऊक झाले. त्यांनी असे सांगितले की या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला घडविले म्हणून आज आम्ही उच्च पदावर कार्यरत आहोत म्हणून या शिक्षकांचे ऋण कधीच विसरणार नाही या शाळेतील शिस्त हे आम्हाला नेहमी आमच्या जीवनात जगायला शिकवते. आज आमच्या बॅचचे ४३ विद्यार्थी सोशल मीडिया द्वारे एकत्र आलो. मात्र प्रत्येकाच्या वैयक्तिक कारणामुळे सर्व जणांना या स्नेह मेलाव्यासाठी उपस्थित राहणे शक्य झाले नाही मात्र आज त्या सर्व मित्रमंडळीची उणीव जाणवते असे सांगितले.

हे विद्यार्थी किती खोडकर, तेवढेच नम्र देखील होते असे प्रा ठकोरे यांनी सांगितले तर महाविद्यालयाचे प्राचार्य ढोपे यांनी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन स्नेह मेळावा आयोजित केला तसेच शाळेला भेटवस्तू दिली त्याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने धन्यवाद देऊन ही शाळा नेहमी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करील असे सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा श्री सुरेश खैरे, सल्लागार रमेश मोरे, माझी प्राचार्य बळीराम निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते संजीव ठकोरे, मनोज शिंदे, प्राचार्य संभाजी ढोपे तसेच शिक्षक वृंद माजी विद्यार्थी केतन शिंदे, दीपक वांद्रे, निखिल कोंडे, राकेश हुले, मुकेश कदम, नितेश थोरवे, आकाश कदम, नितेश थोरवे, शितल शिंदे, नम्रता कोंडे, सुभाष खरात, प्रियंका भणगे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog