हायटेन्शन विजेच्या टॉवरवर चढून आदिवासी तरुणाचा 'शोले स्टाईल' ड्रामा
आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणाचे पोलीसांनी वाचविले प्राण
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव तालुक्यातील कोस्ते आदिवासी वाडीतील तरुण विजेच्या टॉवरवर चढून आत्महत्या करीत असतानाच पोलीसांनी तत्परता दाखवून या तरुणाचे प्राण वाचविल्याने पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, कोस्ते आदिवासी वाडी येथील तरुण अनिल गोपाळ जाधव (वय२३) हा आपली पत्नी सोबत नांदण्यास येत नाही म्हणून तेथे असणारे उच्च दाब विद्युत टॉवरवर आत्महत्या करणासाठी चढला आहे अशी माहिती माणगांव पोलीसांना मिळाली. त्यानंतर माणगांव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरिक्षक नवनाथ लहांगे, सहाययक पोलीस निरिक्षक सतिष अस्वार, पोलिस हवालदार तुणतुणे, पोलीस नाईक मिलिंद खिरीट, पोलीस शिपाई भरत तांदळे, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, पोलीस शिपाई शामसुंदर शिंदे, पोलीस शिपाई सुरवासे यांनी त्वरीत घटना ठिकाणी धाव घेऊन आत्महत्या करण्यासाठी त्या टॉवर वर चढलेल्या अनिल जाधव याला तुला कोणीही काहीही बोलणार नाही असा विश्वास देऊन खाली उतरून आत्महत्येपासून परावृत्त केले.
Comments
Post a Comment