BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS... BREAKING NEWS...
अहिल्यानगर :- थाटे, ता. शेवगाव येथे वाळू माफियांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला... अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोड्यातील ७ आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेऊन एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला... नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपींकडून ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Image
कोल्हापुरात अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी गडहिंग्लज पोलीसांच्या ताब्यात! कोल्हापूर वृत्त (संभाजी पुरीगोसावी) :-   कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यांत भडगांव येथील सौ. सुनीता संजय केसकर (वय 40) हिचा मृत्यू वनप्राण्यांच्या हल्ल्यातून झाल्याचा बनाव अखेर गडहिंग्लज पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये आरोपी प्रियकर प्रवीण चिंचेवाडी आणि सुनीता केसकर या दोघांचे सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते मात्र प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय 34) रा. भडगांव याला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली आहे. सुनुता ही 18 जानेवारी आठवडी बाजारीसाठी घरांतून बाहेर पडली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 21 दिवसांनी महागांव जंगलातील झरा ओढ्यात तिचा मृतदे आढळला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर दागिने व मोबाईल नसणे, तसेच ती व्यक्ती जंगलात जाण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना चांगलाच संशय आला. मात्र तपासाच्या अनुषंगाने ...

गाडीला थांबा मिळण्याबाबत प्रवासी संघटनेच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन

नागोठणे : महेंद्र माने

रेल्वेने नेहमी प्रवास करणार्‍या पेण, नागोठणे, रोहा, माणगांव कर्मचारी प्रवासी संघटनेच्या वतीने दिवा- सावंतवाडी (10105) व सावंतवाडी - दिवा (10106) या गाडीला थांबा मिळण्याबाबत शिवसेना नागोठणे उपविभाग प्रमुख संजय महाडीक,सामाजिक कार्यकर्ते विनोद आंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशी संघटनेच्या सदस्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे.

साधारण 200 ते 225 प्रावाशांनी सह्या केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवा सावंतवाडी व सावंतवाडी - दिवा सदर गाड़ी कोविड -19 महामारी येण्यापूर्वी पेण, नागोठणे, रोहा या ठिकाणी थांबत होती. परंतु कोविड -19 लॉकडाउन दरम्यान सर्व गाड्या बंद झाल्या. व त्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्व पदावर आल्यानंतर सावंतवाडी - दिवा (10106) ही गाडी सुरु करण्यात आली. सदर दिवा – सावंतवाडी (10105) गाडी पनवेल,आपटा व जिते थांबा घेते व  मध्ये कुठेही न थांबता माणगाव व पुढील सर्व ठिकाणी थांबा घेते. मध्ये थांबा न घेतल्यामुळे जिथे ते माणगाव या स्थानकामध्ये असलेल्या ठिकाणच्या गरीब व गरजू प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.तसेच पेण,नागोठणे व रोहा वरुन मुंबईला ये – जा करणारे प्रवाशी,कर्मचारी,अधिकारी व विद्यार्थी मोठया संख्येने प्रवास करीत असून सदरील गाडी थांबत नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तसेच नेहमी सर्व ठिकाणी थांबणारी दिवा- रत्नागिरी (50103) व रत्नागिरी - दिवा (50104) या गाडीप्रमाणे दिवा सावंतवाडी (10105) व सावंतवाडी - दिवा (10106) या गाडीला सर्व ठिकाणी पूर्वीच्या वेळेप्रमाणे थांबे द्यावे व आपल्या प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी असे लिहिले असून सदर बाबींवर सहानुभूतिपूर्वक विचार करावा ही नम्र विनंती शेवटी केली आहे. या निवेदनाची एक-एक प्रत स्टेशन प्रबंधक, पेण, नागोठणे व रोहा रेल्वे स्टेशन यांना माहितीसाठी रवाना करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog