शिहू शाळेतील मुलांनी प्रभातफेरी काढून केली जनजागृती

शिहू : मंजुळा म्हात्रे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी  हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत प्राथमिक शाळा शिहू येथील विद्यार्थांनी हातात तिरंगा घेऊन गावातून प्रभातफेरी काढली.

घरोघरी तिरंगा झेंडा लावा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा विविध घोषणांनी परिसर दुमदूमला होता. या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थांनसह, शिक्षक, अंगणवाडीसेविका यांनी या प्रभातफेरीत सहभाग दर्शवला.

Comments

Popular posts from this blog