खैर तस्करांना वनविभागाचा दणका! 

बेकायदा खैर लाकूड वाहतूक करणारी गाडी वनविभागाने पकडली 

1 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त 

रोहा : समीर बामुगडे

बेकायदा खैर तस्करीचे प्रमाण सध्या वाढू लागले असून या खैर तस्करांना चाप बसविण्यासाठी वनविभागाचे अधिकारी देखील सज्ज झालेले आहेत. अशाच प्रकारे मुरुड वनपरिक्षेत्रातील  केळघरमार्गे मुरुड रस्त्यावर कवलठे गावाजवळ महेंद्रा मॅक्स  पीकअप मधून बेकायदा खैर लाकडाची बेकायदा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने या गाडीची तपासणी करून 1 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उपवनसंरक्षक रोहा  व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा अति. कार्य. वनपरिक्षेत्र अधिकारी मुरुड श्री मनोज वाघमारे व स्टाफ श्री विजय कोसबे वनपाल भालगाव संतोष रेवणे वनपाल, रुपाली पाटील वनरक्षक, सचिन मानकर वनरक्षक,प्रतिभा जलदावार वनरक्षक,किरण जाधव वनरक्षक,वैभव बत्तीसे वनरक्षक, यांनी दिनांक 12/08/2022 रोजी रात्री 08.00 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून मुरुड वनपरिक्षेत्रातील  केलघरमार्गे मुरुड रस्त्यावर कवलठे गावाजवळ महेंद्रा मॅक्स  पीकअप क्रमांक MH/06/G/8104 ची  तपासणी केली असता खैर सोलीव नग  60 घ.मी.0.206  किंमत 1977/- रुपये व जप्त वाहन क्रमांक MH/06/G/8104 अंदाजे किंमत  1,00,000/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व खैर नग असा एकूण एकंदर 1,01,977/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी रमेश कोळी रा.महागाव व बबन पवार रा.मुचने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular posts from this blog