गोफण खाडीपात्रात सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील गोफण खाडीपात्रात महसूल विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
रोहा तालुक्यातील गोफण येथे रेती माफीयांनी धुमाकूळ घातलेला असून येथे सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यामुळे येथील वाळू माफीयांनी महसूल विभागाला विकत घेतले आहे का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. रात्रीच्या अंधारात येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्यामुळे येथील वाळू माफीयांचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी "अर्थपूर्ण" संबंध असल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
येथे सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू माफीयांकडून महसूल विभागाला लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्याने येथे कारवाई होत नसल्याची सर्वत्र चर्चा आहे.

Comments
Post a Comment