नागोठणे पोलीस स्टेशन व लायन्स क्लब आयोजित गणेशोत्सव मंडळांसाठी अनोखी स्पर्धा

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे पोलीस स्टेशन व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पोलिस निरिक्षक राजन जगताप, लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. अनिल गीते व सेक्रेटरी विवेक सुभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बुधवार 31 ऑगस्ट ते शुक्रवार 09 सप्टेंबर या तारखेपर्यंत एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमधील (शासनाच्या नियमाप्रमाणे) नियमावली व गुण पुढील प्रमाणे 

1) गणपती मुर्तीची उंची, सुबकता व शाडुची (मातीची) यावर गुण असतील, 2) दहा दिवसातील कार्यक्रमांर्तगत राबविलेले सामाजिक उपक्रम, 3) ईको फ्रेंडली गणपती सजावट व संदेश, 4) शासन नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे असून यामध्ये रात्रीचे कार्यक्रम राबविताना साऊंड सिस्टीमचा आवाज नियंत्रीत ठेवणे, गणेशमुर्तीचे आगमन व विर्सजन वेळेत गुलाल उधळण, डिजेचा कर्कश आवाज नियंत्रण यामध्ये विचीत्र घोषणा व जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे सजावट नसावे,5) गावातील सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग,6) गेल्या वर्षभरातील तसेच कोव्हीड काळात केलेले काही उपक्रम अशा अनेक निकषांवर आपल्याला या स्पर्धेत नंबर काढण्यात येणार आहे. या सर्धेत प्रथम क्रमांक / व्दितीय कमांक / तृतीय क्रमांक / उत्तेजनार्थ तसेच विजेते व सहभागी सर्व मंडळांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा बक्षिस समारंभ 10 दिवसांच्या गणपती विर्सजनानंतर पुढील 10 दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे सेक्रेटरी विवेक सुभेकर यांनी दिली असून विभागातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन सहकार्य करण्याची विनंती नागोठणे पोलीस स्टेशन व लायन्स क्लब यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog