🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे महिला बचत गटानी उत्पाद्दीत केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन 

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाटणेश्वर येथे उमेद अभियानतर्फे महिला बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. उमेद अभियानाच्या दादर प्रभाग समन्वयक प्रीती पाटील यांनी पाटणेश्वर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

सदर कार्यक्रमाचे उदघाटन पेण तालुक्याच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी   पाटणोली ग्रामपंचायत चे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते. सदर प्रदर्शनामध्ये 30 बचत गटांनी सहभाग घेतला.बचत गटातील महिलांनी घरगुती उत्पादन केलेल्या वस्तू प्रदर्शनामध्ये ठेवल्यामुळे चांगली विक्री झाली. त्यामुळे महिलाना चांगला नफा मिळाला. 

या कार्यक्रमाकरिता तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे तालुका व्यवस्थापक शिरीष पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रभाग समन्वयक प्रीती पाटील, पाटणोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक के. पी. पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व सी. आर. पी. नमिता म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog