महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान अंतर्गत पेण तालुका कक्षाची उंच भरारी
पेण : शेखर सावंत
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान उमेद मार्फत बचत गटासाठी सुरु असलेल्या कार्यामध्ये पेण तालुका कक्षाची उल्लेखनीय कामगिरी पहावयास मिळत आहे.
उमेद अभियांनांतर्गत बचत गट स्थापन करणे, कर्ज वितरण व विविध शासकीय योजनाचा लाभ महिला बचत गटांना दिला जातो. 2013 ते आजतागायत पेण तालुक्यामध्ये 1567 स्वयंसाहायता समूहाची स्थापना करण्यात आली आहे. गटामध्ये 10 ते 15 महिलांना घेऊन, स्वइच्छेने एकत्र आलेल्या समूहातील महिलांची उन्नत्ती, विकास व ग्रामविकास साठी एकत्र आलेला समूह म्हणजे स्वयंसहायता समूह होय. महाराष्ट्र जीवनन्नोत्ती अभियान 2013 पासून राबविण्यात येत आहे. आजतागायत पेण तालुक्यामध्ये 1567 स्वयंसहायता समूह, 60 ग्रामसंघ व 1 प्रभागसंघाची बांधणी करण्यात आली आहे.2021-22 या आर्थिक वर्षात 268 स्वयंसहायता समूहाना 5 कोटी 8 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. याचा फायदा स्वयंसाहायता समूहाना होताना दिसत आहे.
याबाबत माहिती देताना पेण तालुका अभियान व्यवस्थापक शिरीष पाटील यांनी अभियानाच्या कामकाजाविषयी माहिती देऊन पेण तालुका पुढील काळामध्ये अजून प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी पेण तालुका व्यवस्थापक शिरीष पाटील, प्रभाग समन्वयक नितेष म्हात्रे, निमेश तांडेल, प्रीती पाटील व शीतल म्हात्रे तसेच कौशल्य समन्वयक भारत वाघ यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment