आमडोशी येथील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात दाखल

नागोठणे : महेंद्र माने 

रोहा तालुक्यातील आमडोशी येथील अनेक कार्यकर्ते खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे तसेच आ. अनिकेत तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत.

यामध्ये वागणी ग्रा. पं. विद्यमान सदस्य शरद कामथे व सौ. रोशनी भोसले, सुप्रीम कामगार युनियन अध्यक्ष  निवृत्ती जांबेकर तसेच प्रमोद भोसले व भगवान सुतार यांच्यासह साधारण 30 कार्यकर्ते आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतारवाडी येथे रविवार 27 मार्च रोजी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी रोहा तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शिवराम शिंदे, पिंगोडे सरपंच संतोष कोळी, राष्ट्रवादी रायगड जिल्हा युवक सरचिटणीस विनायक गोळे,वांगणी मा. सरपंच तसेच विद्यमान सदस्य एकनाथ ठाकूर, वांगणी ग्रा.पं.सदस्य प्रमोद जांबेकर,शेखर ठाकूर, शंकर ठाकूर, मयुर खैरे, अमित जांबेकेर, भूषण जांभेकर, पंकज जांभेकर, राजू जांभेकर, रमण जांभेकर, यशवंत हलदे, कुणाल तेरडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती एकनाथ ठाकूर यांनी दिली.

Popular posts from this blog