🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रोठ बूद्रूक ग्रामपंचायतीने अपंग लाभार्थी महिलेची केली फसवणूक! 

१ कोटी पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीकडे अपंग निधी देण्यास पैसे नाहीत? 

तारीख संपलेला खोटा चेक देऊन अपंग लाभार्थी महिलेची केली क्रूर चेष्टा 

राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!

ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्यावर कारवाई होणार? 

धाटाव/रोहा : किरण मोरे 

१ कोटी पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या रोठ बुद्रूक ग्रामपंचायत, ता. रोहा या ग्रामपंचायतीची ३% अपंग निधी देण्याची ऐपत नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे! याच गावातील नम्रता नरेश मोरे यांच्या तक्रारीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याच गावातील नम्रता नरेश मोरे यांनी तक्रारीद्वारे केली आहे. विशेष म्हणजे राज्य माहिती आयुक्त यांचे आदेश असताना देखील माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करून वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्या विरोधात लवकरच कारवाई होण्याच्या मार्गावर आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, रोहा तालुक्यातील रोठ बुद्रूक येथील तक्रारदार नम्रता नरेश मोरे यांची नणंद निशा नारायण मोरे ही ६५% मतीमंद असून ३% अपंग निधीस पात्र आहे. तरीही सलग दोन वर्षे ग्रामपंचायतीने अपंग निधी हडप केला होता. 

दरम्यान, याबाबतत नम्रता मोरे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अपंग निधी म्हणून सदर लाभार्थी महिलेला एकूण दोन चेक देण्यात आले. परंतु त्यांपैकी रू. १,२०,०००/- (रू. एक लाख वीस हजार) चेक क्र. ०८४३४६ या चेकवर ३१ मार्च २०१८ ही तारीख टाकून तो चेक दि. १८ डिसेंबर २०१८ या तारखेला लाभार्थी महिलेला देण्यात आला. अर्थात नऊ महिने आधीची तारीख टाकून हा न वटणारा चेक देऊन रोठ बुद्रूक ग्रामपंचायतीने अपंग लाभार्थी महिलेची क्रूर चेष्टा व फसवणूक केली आहे. 

त्याचप्रमाणे नम्रता नरेश मोरे यांनी रोठ बुद्रूक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्याकडे माहितीच्या अधिकारांतर्गत रोठ बुद्रूक ग्रामपंचायत हद्दील ग्रामनिधी, कॅशबुक, बँक स्टेटमेंट, विकासकामे व अन्य महत्वपूर्ण माहिती मागविली होती. परंतु माहितीचे शुल्क रू. २०,०००/- घेऊन देखील ग्रामसेविका अलका बामुगडे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. परिणामी नम्रता मोरे यांनी याप्रकरणी राज्य माहिती आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी होऊन राज्य माहिती आयुक्तांनी १५ दिवसांत संबंधित माहिती देण्याचे आदेश दिले होते. परंतु ग्रामसेविका अलका बामुगडे यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून अद्यापही माहिती दिलेली नाही. सदरच्या लपविलेल्या माहितीतून मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नम्रता नरेश मोरे यांनी याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे याप्रकरणी तक्रार दाखल करून ग्रामसेविका अलका बामुगडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. 


Comments

Popular posts from this blog