बेवड्या ग्रामसेवकाला चढलाय माज, दारूची पार्टी करताना वाटत नाही लाज! 

"सुनिल" नावाचा भामटा करतोय बेवड्यांची चमचेगिरी 

रायगड : प्रतिनिधी 

एक बेवडा ग्रामसेवक दारूच्या इतक्या आहारी गेलाय की, तो दारू पितो की दारू त्याला पिते? हे समीकरण सोडविणे मुश्कील झालेले आहे. तरी पण हा बेवडा ग्रामसेवक म्हणतो की, "मी दारू पित नाही, कारण मला प्यायल्यावर चढत नाही!" असे म्हणायला ह्याला थोडी पण लाज वाटत नाही. विशेष म्हणजे "सुनिल" नावाचा एक भामटा पण ह्या बेवड्यांची चमचेगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. कुठे किती आगावपणा करायचा याची तर मर्यादा या बेवड्या ग्रामसेवकाने ओलांडलीय. 

ग्रामसेवक हरामाच्या पैशातून दारूची पार्टी करतो? ही चर्चा सर्वत्र पसरल्याने बेवड्या ग्रामसेवकाला चांगलेच झोंबल्याचे दिसत आहे आणि म्हणतात ना.... "बुडत्याला काडीचा आधार!" अगदी त्याचप्रमाणे या बेवड्या ग्रामसेवकाने सुनिल नावाच्या भामट्याचा आधार घेतल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे. या सुनिल नावाच्या भामट्याची पार्श्वभूमी पाहिली असता हा तर ५०० ते १००० रूपयांमध्ये विकला जाणारा भामटा म्हणून फेमस असून हा तर हरामाच्या पैशांतूनच स्वतःच्या कुटूंबाला पोसणारा "विकाऊ" माणूस असल्याचे बोलले जात आहे.


Popular posts from this blog