🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रोहा नगर पालिका प्रशासन अधिकाऱ्याचा निष्क्रीय कारभार! 

मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर!

धाटाव/रोहा : किरण मोरे

मुजोर प्रशासन अधिकाऱ्याने रोहा नगर पालिकेची सर्वात प्रतिष्ठेची असलेल्या मंगलवाडी संकुलातील प्रफुल्ल बारटक्के विद्यामंदिर शाळा क्रमांक १० येथील केंद्रप्रमुख पद हेतूपुरस्सर दूसऱ्या शाळेत हलवले, गुणवंत शिक्षकांच्या जाणीवपूर्वक बदल्या केल्या आणि एकेकाळी ३०० विद्यार्थी असणाऱ्या या शाळेचा पट अनपेक्षितपणे १०० च्या खाली आला. घसरणाऱ्या पटाचा आलेख पाहता प्रशासन अधिकाऱ्याने लवकरच शाळा बंद करण्याचा निर्धार केला असल्याचे दिसून येते. मुळात एकाच मैदानावर तीन वेगवेगळ्या नावाने शाळा भरवणे कायदेशीररित्या चुकीचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

घसरणीला लागलेल्या विद्यार्थी संख्येमुळे शाळा क्रमांक १० ची मंजूर शिक्षक संख्याही कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पालक या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक नाहीत. याचा मोठा विपरीत परिणाम पहिलीच्या ॲडमिशनवर झालेला आहे. 

शिक्षकांमध्ये डावा/उजवा करणे ही प्रशासन अधिकाऱ्याची खासियत आहे. शासकीय कामे देताना मर्जीतील शिक्षकांना सवलत दिली जाते आणि इतरांना त्यांचे म्हणणे ऐकून न घेता उद्धटपणे बोलून अपमानास्पद वागणूक दिली जाते. 

सादर केलेल्या संचमान्यतेनुसार शाळा क्रमांक १० मध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नसल्याचे दिसून येते. या शाळेवरील मुख्याध्यापकाचे प्रत्यावर्तन (Reversion) करण्याची नामुष्की शिक्षण समितीवर ओढवली आहे. रोहा नगरपालिका शिक्षण समिती व्यतिरिक्त आणखी एका नगरपालिकेची जबाबदारी प्रशासन अधिकाऱ्यावर असल्याने याचा गैरफायदा घेऊन प्रशासन अधिकारी कधीच कार्यालयात उपस्थित नसतो. त्यामुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागायची कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. अशा या निष्क्रीय अधिकाऱ्यावर वरिष्ठांकडून कठोर कारवाई व्हावी यासाठी लवकरच सचिवालयात पुराव्यानिशी लेखी तक्रार करण्यासाठी काही तक्रारदार पुढे देखील आलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog