🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

गावाचा विकास हाच सरपंच सेवा संघाचा ध्यास

अहमदनगर (प्रतिनिधी) : गावाचा विकास हाच सरपंच सेवा संघाचा ध्यास... हे ब्रीद वाक्य घेऊन चार वर्षांपूर्वी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना केली आहे.सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही  सरपंच संघटना महाराष्ट्रातील सरपंच यांचे न्याय हक्क व मागणीसाठी सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच यांचे न्याय हक्क व मागणीसाठी लढा देणारी पहिली नोंदणीकृत सरपंच संघटना आहे. 
संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्य करत असुन पंधरा हजार सरपंच सभासद आहे. सरपंच सेवा संघाने २१कलमी मागणीचा कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्र शासन दरबारी अनेक मागण्या करून घेतल्या आहेत.या मध्ये प्रामुख्याने सरपंच मानधन वाढ हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सरपंच सेवा सघाने सोडविला आहे. येत्या काळात सरपंच विज बिलाचा प्रश्न,प्रत्येक  सरपंच सरपंच यांना संगणक परिचारक नेमणुकीचा अधिकार व सोबत सरपंच यांना जास्तीचे अधिकार अशा अनेक मागण्या सरपंच सेवा संघाच्या वतीने शासनदरबारी सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यरत राहील.

Comments

Popular posts from this blog