ब्रेकिंग न्यूज
🚨 वीटभट्टीतून थेट लंडनच्या विद्यापीठापर्यंत!!! आदिवासी समाजातील सपना वाघमारेच्या जिद्दीची सातासमुद्रापार ऐतिहासिक झेप... रायगडची पहिली आदिवासी महिला वकील आता लंडनमध्ये घेणार कायद्याचे उच्च शिक्षण... 🚨

‘अ स्टेप अहेड स्कूल’ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुलांनी घेतला सुसंस्कारांचा वारसा
संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई महिला आघाडीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

बोरीवली-​मुंबई (प्रतिनिधी) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शिवाजी नगर येथील ‘अ स्टेप अहेड स्कूल’ मध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूनम शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला. समाजातील बालवयातील मुलांवर महापुरुषांच्या विचारांचे संस्कार व्हावेत आणि त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात अतिशय मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरणात 'त्रिवार पंचशील वंदनेने' करण्यात आली. यावेळी ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटली. स्पर्धेनंतर सहभागी आणि विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहित करण्यात आले. केवळ मनोरंजन किंवा स्पर्धा एवढ्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित न राहता, मुलांच्या नैतिक जडणघडणीवर यात भर देण्यात आला. उपस्थित मुलांना ‘बालमित्र’ या संकल्पनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व मुलांनी एक सामूहिक प्रतिज्ञा घेतली की, "आम्ही लहान मुले कधीही कोणाला उलट बोलणार नाही, कोणालाही शिवीगाळ करणार नाही, आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींचा सदैव आदर राखू आणि भविष्यात देशाचे जबाबदार व प्रतिष्ठित नागरिक बनू." मुलांनी घेतलेल्या या शपथेने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष नंदा तलवटकर, जिल्हा संघटक सुनीता सोनवणे, वॉर्ड संघटक श्रद्धा मोरे, गट प्रमुख सुरेखा आलमवार, गटप्रमुख जया रेड्डी, शरीफा शेख आणि युवा अध्यक्ष निकिता सोनवणे यांचा सक्रिय सहभाग लाभला.

​कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उपस्थित सर्व बालकांना खीर आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा पूनम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.


Comments

Popular posts from this blog