५ नोव्हेंबर रोजी सासवड येथे पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
यामध्ये भक्ती संगीत, भावगीत, लोकसंगीत तसेच हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा समावेश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यावेळी पुरंदरच्या कलाकारांचा "पुरंदरचा मराठी बाणा" दिसून येणार आहे.
पुरंदरचे स्वरसम्राट प्रविण गायकवाड, विकी कदम, सुवर्णा होले, ऐश्वर्या कामठे, प्रमोदकुमार खेनट यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. तरी यासाठी जास्तीत जास्त संगीत प्रेमी व रसिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पुरंदर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप जगताप, पुरंदर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष राहूल शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मिलींद जाधव, गुणशेखर जाधव, नाट्यकलावंत डॉ. दिपक जगताप, कलाकार प्रकाश ढवळे व कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment