🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

प्राणाची बाजी लावून त्याने पर्यटकांचे प्राण वाचवीले! 

पाटणूस भिरा देवकुंड येथील घटना, भिरा धनगर वाडीतील गाईडला आले धाडसी मरण

पाटणूस पंचक्रोशीत दुःखाचे सावट

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा परिसरातील सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा पर्यटनाला भेट देण्यासाठी प्रतिदिन अनेक पर्यटक येत असतात. हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असल्याने या पर्यटकांना मार्गदर्शन करणे आवश्यक असते. कारण भिरा येथून देवकुंड ला जाण्यासाठी 7 कि. मि. चा रस्ता आहे. रस्ता जंगलातून असल्याने पर्यटक वाट चुकू शकतात म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक गाईडची गरज लागते. पूर्वी पर्यटना साठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असायची त्यामुळे एक दोन गाईड असले तरी काम भागायचे परंतु गेल्या तीन चार वर्ष्यात संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून सुद्धा पर्यटक येऊ लागले आहेत त्यामुळे कधीकधी सहा सात हजार पर्यंत पर्यटकांची संख्या वाढत जाते. 

या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन झाले नाही तर अपघात होऊ शकतो. आणि म्हणून पाटणूस पंच क्रोशितील तरुणांनी एक टीम तयार केली असून या टीम च्या माध्यमातून 70 ते 80 गाईड काम करतात. मग हे गाईड येणाऱ्या पर्यटकांचे ग्रुप तयार करून या पर्यटकांच्या ग्रुपला नंबर दिला जातो. मग या सर्व ग्रुप ची मिटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. मग तेथे उपस्थित असणाऱ्या गाईड मधून चैन सिस्टम प्तद्धतीने पर्यटकांना नेले जाते व त्यांना देवकुंड दर्शन घडविले जाते. जसे पर्यटकांना नेले तसेच ट्रेकिंग पॉईंट पर्यंत सुरक्षित पणे आणून सोडले जाते. या मुळे गेल्या चार वर्षात स्थानिक गाईड तरुणांनी एकही अपघात घडू दिला नाही. मात्र सोमवारचा दिवस हा पाटणूस पंचक्रोशीतील तरुणांसाठी घात वार ठरला. सोमवार दि. 6/9/2021 रोजी काही पर्यटक देवकुंड धबधब्याकडे रवाना झाले. सकाळ पासून पाऊस नसल्याने ढगाळ वातावरण होते. मध्ये मध्ये कडक ऊन सुध्दा पडत होता. पर्यटकांना ने आन करण्यासाठी तरुणांनी साखळी लावली होती. देवकुंडच्या अलिकडे एक ओढा लागतो. पाऊस असेल तर या ओढ्याला खूप पाणी असते त्यामुळे पर्यटकांना या ओढ्यावर बांधलेल्या लाकडी पुलावरून पर्यटकांना सुरक्षित पलीकडे पोहचविले जाते. काल पाऊस नसल्याने ओढ्याला खूप पाणी कमी होते. त्यामुळे सर्व पर्यटकांना त्यांच्या आग्रहास्तव ओढ्यातून नेण्यासाठी उतरविण्यात आले. या पर्यटकांना ओढ्यातून सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी तेथे उपस्थित असणाऱ्या चार गाईड यांचेवर होती. सहा पर्यटक आरामात ओढा पार करीत होते ओढ्यात भले मोठे दगड गोटे असल्याने त्याचे निरीक्षण करीत पर्यटक ओढा पार करीत होते. ड्युटीवर असणारे गाईड दिलीप गजानन मोरे वय 46 वर्ष, रा. धनगर वाडी भिरा, प्रशांत नामदेव कदम रा. म्हसेवाडी,लक्ष्मण सुरेश वाडकर रा. विठ्ठल नगर. चंद्रकांत नथुराम निवेकर रा. धनगर वाडी भिरा हे सर्व जण पर्यटकांना सोबत घेऊन येत होते मात्र त्याच वेळी डोंगर माथ्यावर तुफान पाऊस कोसळत होता. सर्वजण ओढ्याच्या मध्यावर असताना क्षणार्धात वरून पाण्याचा लोंढा आला त्यामुळे सर्वांची पळापळ झाली. दिलीप मोरे याने तीन पर्यटकांना किनारी काढले. एक मुलगी वाहत आहे हे त्याने इतरांना ओरडून सांगितले त्या मुलीला देखील सुखरूप बाहेर काढण्यात आले नितिन मोरे आणि त्याच्या बरोबरचा तरुण वाहू लागला परंतु तो एका दगडाचा आधार घेऊन होता त्याला ही सर्वांनी बाहेर काढले. दोन पर्यटक किरकोळ जखमी झाले परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने दिलीप प्रवाहाबरोबर वाहत गेला. 

पट्टीचा पोहणारा असला तरी दगडावर डोके आपटून गतप्राण झाला. सर्व गाईड यांच्या मद्ये नेहमी अग्रेसर असणारा नितीन पर्यटकांना वाचविताना पाण्याबरोर योद्यासारखा लढला. मात्र आग आणि पाणि याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. दिलीप याच्या मागे पत्नी, दोन लग्न झालेल्या मुली, 21 वर्षीय मुलगा आणि वयोवृद्ध आई असा परिवार आहे. दिलीपच्या मृत्यू ची बातमी समजताच पाटणूस पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याच ओढ्यावर 74 वर्षीय आजोबा पांडुरंग श्रीपत मेंगडे यांनी लाकडी पूल बांधला असून ओढ्याला पाणि असेल तेव्हा पर्यटक याच पुलावरून सुरक्षित ये जा करतात. याच पुलाचा वापर पर्यटकांनी केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती. अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

Comments

Popular posts from this blog