खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे व्हॉट्सअप स्टेटस गीत तुफान व्हायरल
रायगड (किशोर केणी) : रायगडचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने खास तयार करण्यात आलेले व्हॉट्सअप स्टेटस गीत समाज माध्यमांवर अल्पावधीत तुफान व्हायरल झालेले आहे.
दिनांक दहा जुलै रोजी खासदार सुनिलजी तटकरे यांचा वाढदिवस असतो. या दिवशी त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुतारवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी करीत असतात. मात्र या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सुनिलजी तटकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहाजिकच कार्यकर्त्यांचा हिरमोड जरी झाला असला तरी कार्यकर्त्यांनी फ्लेक्स बॅनर, वृत्तपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा संदेश दिले.
सध्या समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एका कार्यकर्तीने चक्क स्टेटसला ठेवण्यासाठी साहेबांवर आधारित गीत बनवले. काही तासांतच ते व्हॉट्सअप ग्रुप वरून तुफान व्हायरल झाले. गीताचे शब्द, संगीत, मांडणी व गायन सगळे कसे एका मिनिटात चपखळ बसले हा कौतुकाचा विषय बनला आणि बघता बघता समाजमाध्यमांवर हे गीत तुफान व्हायरल झाले. अनेक कार्यकर्त्यांनी हे गीत आपल्या स्टेटस वर ठेवले, तर अनेक लोक हे गाणे कुठे ऊपलब्ध होईल याचे चर्चा करताना दिसले.
"कीर्ती गाजे की रायगडची,
खासदार तटकरे साहेबांची."
ही टॅगलाईन पकडून तयार केलेल्या गीताने तरुणाईला ठेका धरायला लावले. ह्या गीताचे लेखन व गायन केले आहे रविना मालुसरे यांनी! रविना मालुसरे या रोहा तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटक आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड असून जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. विज्ञान शाखेच्या पदवीधर असलेल्या रविना मालुसरे पत्रकार असून अचूक शब्दात बातमीचे लेखन करण्याची त्यांची खासियत आहे. न्युज अँकर व व्हॉईस ओव्हरचे त्या काम करतात.
कोकणात विकास कामांची गंगा आणणार्या खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांनी हटके पद्धतीने गीत तयार केले आहे.फक्त एक मिनिटांचे गीत इतके लोकांच्या पसंतीस उतरेल याची आपल्याला कल्पना नव्हती, असे त्या प्रांजळपणे कबूल करतात. आगामी काळात आपल्या सहकाऱ्यांसमवेत पारंपारिक गीत ध्वनिमुद्रित करण्याचा त्यांचा मानस आहे. केवळ एका मिनिटाच्या या व्हाट्सअप स्टेटस खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रंगत आणली,हे याचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
या गीत लेखनाबद्दल खासदार सुनीलजी तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरेंसह अनेक कार्यकर्त्यांनी रविना मालुसरे यांचे कौतुक केले आहे.