वरसे येथे अनधिकृत बांधकाम, पत्रकार समीर बामुगडे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडून ग्रामविकास विभागाला चौकशीचे आदेश!
अनधिकृत बांधकामांना पाठबळ देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार!
रोहा (प्रतिनिधी) : वरसे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सातमुशी नाल्यावर व अन्य ठिकाणी अनधिकृत बांधकामे केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी रोहा तालुक्यातील पत्रकार समीर बामुगडे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत ग्रामविकास विभागाला यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही बांधकामे करणाऱ्यांच्या गळ्याभोवती कारवाईचा फास आणखीनच घट्ट झाल्याचे दिसत आहे!
राजकीय वरदहस्तामुळे आजपर्यंत अनधिकृत बांधकामे सुरक्षित?
सदरच्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर चौकशीचे आदेशही निघाले होते. मात्र राजकीय वरदहस्तामुळे या अनधिकृत बांधकामांना मोठी मजबूती मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, थेट मुख्यमंत्र्यांनीच या अनधिकृत बांधकामांबाबत चौकशीचे आदेश दिल्याने या बांधकामांना पाठबळ देणारी 'राजकीय पावर' आता 'फुसकी' ठरणार आहे हे निश्चित झालेले आहे! बेजबाबदार लोकप्रतिनिधी, भ्रष्ट शासकीय अधिकारी आणि त्यांच्यामागे असलेली 'राजकीय पावर' यामुळेच ही बांधकामे आजपर्यंत ही अनधिकृत बांधकामे सुरक्षित आहेत. या अनधिकृत बंधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याच्या मार्गावर आहे.