वरसे ग्रा. पं. हद्दीत नाल्यावर बिल्डरचे अतिक्रमण!

रोहा (समीर बामुगडे) : रोहा शहरालगत वरसे ग्रामपंचायत हद्दीत असलेला नैसर्गिक सातमुशी नाला या मार्गावरुन अनेक वर्षांपासून वाहत आहे. येथील परिसरातील खाजगी बांधकाम व्यावसायिकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासकीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून या नाल्यावर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे रोहे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेली काही वर्षे हा नैसर्गिक सातमुशी नाला विविध विषयांमुळे चर्चचा विषय बनून राहिला आहे. या नाल्यावर येथील बिल्डरने अतिक्रमण करुन स्लॅब टाकून रस्ता बनवला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वरसे गामपंचायत हद्दीत अनधिकृत बाधकाम जोरात सुरू आहेत. तर या बांधकाम करणाऱ्या वयसायिकांनी काही वर्षांपूर्वी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले व त्यांनी पाहणी केली असता सातमुशी नाल्यावर येथील ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरने अतिक्रमण केले असल्याचे दिसून आले. वरसे ग्रामपंचायतीमध्ये सगळीकडे नैसर्गिक नाले आहेत त्याठिकाणी बिल्डरचे मनमानी कृत्य दिसून येत आहे. परंतु त्यानंतर आजपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी येथील अतिक्रमणाबाबत उच्चस्तरिय चौकशी होऊन कारवाई होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या बिल्डरवर कुणाचा वरदहस्त आहे याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog