विज ग्राहकांना सुविधा देण्यासाठी महावितरण तळा शाखेचे विभाजन गरजेचे

तळा (संजय रिकामे) : महावितरण कंपनीने तत्काळ सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी तळा तालुका भौगोलिक दृष्ट्या खुप मोठा आहे सदर तालुक्यात महावितरण कंपनीचे एकच शाखा कार्यालय आहे. संपूर्ण तळा तालुक्यात बारा हजार ग्राहक आहेत. तालुक्यात 66 गावे असुन 22 वाड्या आहेत दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढतच आहे त्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा मिळण्यासाठी व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तळा शाखा कार्यालयाचे विभाजन करणे गरजेचे आहे.                            तळा तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व पदे सध्या भरलेली आहेत. तालुक्यासाठी उपविभाग कार्यालय आणि शाखा कार्यालय असे दोन विभाग आहेत. उपविभाग कार्यालयात उपकार्यकारी अधिकारी-1, कनिष्ठ अभियंता-1, उच्चस्तर लिपीक- रिक्त ( सध्या अतिरिक्त कारभार पाली उपविभाग), निमस्तर लिपिक- 1, प्रधान तंत्रज्ञ-1, कंत्राटी कामगार-1 अशी एकुण सहा पद आहेत तर शाखा कार्यालयात सहाय्यक अभियंता -1, प्रधान तंत्रज्ञ-1, वरिष्ठ तंत्रज्ञ- 5, कंत्राटी कामगार- 8, असे पद आहेत. गेल्या वर्षी निसर्ग चक्री वादळात महावितरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणाला चार महीने लागले काकडशेतच्या टोकापासुन ते कासेखोल पर्यंत आणि गिरणेच्या टोकापासून ते मजगाव पर्यंत ग्राहकांना सेवा देण्यासाठी कर्मचारी वर्गाला तारेवरची  कसरत करावी लागत आहे आणि म्हणुनच वादळानंतर सहा दिवस उलटून गेले तरी अनेक गावे आजही अंधारात आहेत. त्यामुळे तळा शाखेचे विभाजन होणे गरजेचे आहे. 

उन वारा पावसाची तमा न बाळगता महावितरणाचे कर्मचारी दिवसरात्र राबतात तसेच अनेक ठिकाणी त्यांना जीव धोक्यात घालुन काम करावे लागते. त्यामुळे कर्मचारी तणावात असतात. तो तणाव दुर करण्यासाठी ठोस उपाय योजना म्हणुन शाखेचे विभाजन करणे गरजेचे आहे. तळा शाखा कार्यालयाचे विभाजन बाबतचा प्रस्ताव वरिष्ठा शाखा (बांद्रा) येथे  23/7/ 2015 रोजी पाठविण्यात आला आहे. तालुक्यात महावितरणाचे विभाजन होऊन दुसरे सेक्शन आल्यास त्यास एक शाखा अभियंता आणि 12 वायरमन मीळतील आणि काम करण्यास सोपे जाईल महावितरणाच्यावतीने मांदाड येथे दुसरे सेक्शन व्हावे यासाठी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.

पालकमंत्री महोदयांनी लक्ष द्यावे.

मागील चक्रीवादळात तळा तालुक्यात महावितरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दोन ते तीन महीन्यांच्या कालावधी नंतर लाईट सुरळीत सुरु झाली मधल्या काळात पालकमंत्री अदितीताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे आमदार अनिकेत यांनी महावितरण गैरसोई संदर्भात आढावा बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले. त्यावेळी तळेवासीयांनी मांदाड येथे तालुक्याचे सब डिव्हीजन व्हावे अशी मागणी देखील केली होती. पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी तळा तालुका महावितरणाचे विभाजन करुन विजेच्या संदर्भात सर्व सामान्य जनतेला योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog