सर्प मारु नका, तो एक पर्यावरणाचा भाग आहे!
- वैभव कदम
बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : नुसतं सर्प म्हटलं तरी अंगावर भीतीने काटा उभा रहातो! मग हा सर्प टॉयलेट मध्ये, बेडरुम मध्ये, अंगणात, परसावात रस्त्यात, अडगळीच्या ठिकाणी, कुठेही अचानक दिसतो. लोकं त्याच्या भितीने घाबरुन त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण सर्पाला जीवे मारतात.
वास्तविक पहाता तो त्याचा जीव वाचविण्यासाठी भीती पोटी लपलेला असतो. सर्प एक पर्यावरणाचा भाग आहे, सर्पाला मारु नका. त्याला जीवदान द्या. असे आवाहन सर्पमित्र कदम यांनी केले आहे.
अलिकडे काही सर्पमित्र सर्पाला पकडतात व मारतात. यापलिकडे जाऊन सर्पाविषयी नागरिकांमध्ये भिती निर्माण करतात. ती भिती घालवण्याचा प्रयत्न सर्पमित्र वैभव कदम करीत आहेत.
सर्प ही देशाची संपत्ती जरी असली तरी तो दुर्मिळ होत चालले आहेत. तेव्हा त्यांना वाचविणे हे सर्वांचेच काम आहे. सर्पाच्या अनेक जाती आहेत. काही विषारी तर काही बिनविषारी याविषयी बोर्ली पंचंतन येथेल सर्प मित्र वैभव विजय कदम यानि सांगितले, 'सर्प जरी विषारी असले तरी तो मुद्दाम कोणाला चावत नाही काही ठीकिणि स्वताला सर्प मित्र म्हणवुन घेणारे सर्प पकडतात व तो डुक धरुनये म्हणुन मारतात. मारण्या पेक्षा त्याला जीवदान देणे हे सर्प मीत्राचे काम आहे. मी स्वता सर्प मित्र आहे पण सर्प पकडताना त्याला दुखापत होणार नाही व पकडल्यावर त्याला निर्मनुष वस्तीत सोडुन देतो या कार्यात माझे मित्र, अक्षय दिवेकर, सोहम तोडणकर, रूपेश दिवेकर, बंड्या भाटकर, संजय परकर, कान्हा पडवेकर, शुभम तोडणकर, मिहिर भानुशाली यांची साथ मिळतेच या शिवाय बोर्ली पंचंतन ग्रामपंचायतीचे सदस्य नंदकिशोर भाटकर यांची मोलाची साथ लाभत असल्याचे वैभव कदम यांनी सांगितले.