कालव्याच्या साफसफाईच्या नावाने बोगस बिले काढण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे कारस्थान!
शासनाचा पैसा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या खिशात
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा एक नवीनच उपद्व्याप समोर आलेला असून त्यांनी कालव्याच्या साफसफाईच्या नावाने बोगस बिले काढण्याचे कारस्थान केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे.
पिंगळसई ते नडवली पर्यंत जेसीबीच्या साह्याने कालवा साफसफाईचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. तर एकीकडे जलसंपदा विभागाने पूर्वीची असणारी दुबार पेरणी नष्ट केली आहे. दरवर्षी पावसाळा जवळ आला की, बोगस बिले काढण्यासाठी येथील अधिकाऱ्यांचे अशाच प्रकारे कालवा साफसफाईचे नाटक सुरू होते. "पगार शासनाचा आणि दलाली ठेकेदारांची" अशी वृत्ती असणाऱ्या येथील अधिकाऱ्यांची शासनातर्फे उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.