विळे पाटणूस भिरा परिसरात सापडतायत कोरोनाचे रुग्ण! 

प्रशानाकडून भिरा व आजूबाजूचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर, तर विळे परिसरात 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर 

म्हसेवाडी येथे एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू!

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस परिसरातील भिरा येथे 17 कोरोना रुग्ण, म्हसेवाडी येथे 10 रुग्ण, बहिरीवाडी येथे 3 रुग्ण, भिरा धनगर वाडी येथे 3 रुग्ण सापडले आहेत. शिवाय म्हसेवाडी येथे एका महिला रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेत भिरा व आजूबाजूचा परिसर परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तर विळे परिसरातही 17 कोविड रुग्ण सापडल्याने विळे परिसरात 10 दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2021 या कालावधीत पाटणूस भिरा, विळे परिसरात मोठ्या प्रमाणात हळदी कार्यक्रम, लग्न व अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रमांना शहरवासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. त्यामुळे नकळत लोकांमध्ये कोविडचा फैलाव झाला व ग्रामस्थ कोरोनाग्रस्त झाले. पोस्को कंपनीत पॉजिटीव्ह कर्मचारी होण्याचे प्रमाण वाढले. या सर्व बाबींची दखल घेत टाटा पॉवर भिरा कंपनीने काही कालावधी साठी रायगड बाजार बंद ठेवले असून कंपनी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कंपनीच्या कॉलनी बाहेर योग्य कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंधन केले आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या वतीने फेरीवाले व अनोळखी व्यक्तींना प्रवेश बंदी केली आहे. विळे परिसर ठराविक कालावधीसाठी लोकडाऊन केल्याने परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असे विळे ग्रामपंचातीच्या वतीने सांगण्यात येत आहे. परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये व घरातच राहून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog