तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ८९० नागरिकांचे लसीकरण पूर्ण
एक दिवस पुरेल एवढाच लस साठा उपलब्ध
तळा (संजय रिकामे) : तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा लस टंचाई निर्माण झाली आहे.या आधी लस घेल्यानंतर सौम्य ताप येत असल्याने तालुक्यातील नागरिक लसीकरण करण्यास घाबरत होते. त्यामुळे दिवसाला ८ ते १० नागरिकच कोरोना प्रतिबंध लस घेत होते. मात्र तळा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवाटकर यांनी तळेवासीयांना लसीचे महत्व पटवून दिले व नागरिकांची कोविड लसी बाबत भीती दूर केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली. तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्तापर्यंत ८९० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रशासनाने कोविड प्रतिबंध लस देण्याचे आदेश दिल्यानंतर तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्याचे तीन दिवस नागरिकांना लस देण्यात येत आहे. १००/१५० जण कोरोना लस देण्यात येत होती. सध्या स्थितीत दिवसाला ५० ते ६० नागरिकांना लस देण्यात येत आहे.लसीकरणासाठी नागरिकांची संख्या वाढल्याने लसीची कमतरता जाणवत आहे.सध्या स्थितीत ६० कोव्हीशिल्ड लस उपलब्ध असून एक दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Post a Comment