🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

बोर्लीपंचतन येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची धडक कारवाई

एका दिवसात सात हजारांची दंड वसुली!

बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून विवीध उपाययोजना आखल्या जात आहेत.

मागील काही दिवसांत श्रीवर्धन तालुक्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडून याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. परंतु त्यानंतरही अनेक नागरीक जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन न करता विनामास्क फिरुन कोरोना संसर्गाला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून व आपल्या विभागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन बाजारपेठेमध्ये विनामास्क फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणारे दुचाकीस्वार, चार चाकी वाहन चालक, व्यापारी व नागरीकांवर धडक कारवाई करुन एका दिवसात सात हजारांचा दंड वसूल केला. यावेळी श्री.लसंदिप पोमण यांनी नागरीकांना आवाहन केले की, सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्स) पालन करा, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, आपण स्वतः सुरक्षित रहा व समोरच्याला सुध्दा सुरक्षित ठेवा तसेच प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करुन आपला विभाग कोरोना संसर्गापासून दूर ठेवा. सदर कारवाईत वाहतुक पोलीस शशिकांत भोकरे, होमगार्ड व ग्रामपंचात कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog