शिहू परिसरात बोगस डॉक्टरचा धुमाकूळ!

रायगड (प्रतिनिधी) : पेण तालुक्यातील शिहू परिसरात एका बोगस डॉक्टरने धुमाकूळ घातलेला असून वैद्यकीय क्षेत्रातील अपुऱ्या ज्ञानाच्या आधारावर या बोगस डॉक्टरने रूग्णांच्या जीवनाशी खेळ मांडल्याचे दिसत आहे. 

या बोगस डॉक्टरने येथे दवाखाना थाटलेला असून येथे होणाऱ्या चुकीच्या उपचारांमुळे रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. रूग्णांना घाबरवून तसेच आजाराची भिती दाखवून या बोगस डॉक्टरने रूग्णांची लुबाडणूक सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलेला आहे. 

जिल्हा आरोग्य यंत्रणेने या गंभीर समस्येची दखल घेऊन या बोगस डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog