🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

तळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडर दिला भेट

तळा (संजय रिकामे) : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची वाढती संख्या काळजी करण्यासारखी आहे. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी शासन वेगवेगळे पर्याय अवलंबत आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तळा सारख्या ग्रामीण भागाचा जर विचार केला तर तालुक्याच्या ठिकाणी एकही ऍम्ब्युलन्स नाही. तर नव्याने होत असलेल्या ३० खाटांच्या इस्पितळाचे काम कासव गतीने सुरु आहे. तळे तालुक्यातील आरोग्याच्या बाबतीत एकच आधार आहे ते म्हणजे तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळा सारख्या ग्रामीण भागात देखील रुग्ण कमी अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. तळा सारख्या ग्रामीण भागातून एखादा रुग्ण तातडीने दुसरी कडे नेण्यासाठी १०८ ऍम्ब्युलन्स मागवावी लागते आणि ती येण्यासाठी काही अवधी लागू शकतो आणि तेव्हड्या काळात जर रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली तर त्या रुग्णाला तातडीने कृत्रिम ऑक्सिजन पुरवावा लागतो. हीच गरज लक्षात घेता आज हिरवळ प्रतिष्ठान महाड, आपलं कोकण एक मराठी न्यूज चॅनेल, लोकप्रिय दैनिक रायगड टाइम्स आणि विराज केबल नेटवर्क तर्फे १० किलो क्षमतेचा ऑक्सिजन सिलेंडर व त्याला लागणारे सर्व साहित्य तळाप्रार्थमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यात आले. या प्रसंगी तळाप्रार्थमिक केंद्रातीलडॉअमोल बिरवाडकर,  डॉ. प्राची घोसाळकर, निलेश कार्लेकर (औषधनिर्माण अधिकारी) मोहित मोरे आणि हिरवळ प्रतिष्ठानचे सदस्य श्री. प्रदीप शेठ आणि विराज केबल नेटवर्क तर्फे विराज टिळक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog