🚨 अहिल्यानगर :- थाटे, ता. शेवगाव येथे वाळू माफियांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ आरोपींकडून १० लाख २० हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 🚨 अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोड्यातील ७ आरोपींना ४८ तासांच्या आत ताब्यात घेऊन एकूण १ कोटी १२ लाख ३२ हजार रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला. 🚨 नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, तसेच घरफोडी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून आरोपींकडून ६ गुन्ह्यांतील २ लाख १८ हजार ५०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 🚨

दिघी सागरी पोलीसांची अशीही सेवा! 

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या हस्ते बोर्लीपंचतन येथील गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : महाराष्ट्र शासनाकडून कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखणेकामी ब्रेक द चेन च्या माध्यमांतून लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधित काळात गरीब व गरजू लोकांचे हाल होताना दिसत आहेत. मात्र अशा लोकांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीसांची माणुसकी अनुभवली.

दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या संकल्पनेतून मौजे कोंडे पंचतन व वांजळे येथील गरजवंत लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून करण्यात आले. एकूण पंचवीस गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मास्क व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवत हे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप चव्हाण तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. दररोज ताणतणाव, संचारबंदी चा बंदोबस्त शिवाय कोरोना संक्रमणाची दाट शक्यता असताना देखील पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतेवेळी काही वेळ त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य प्रकर्षाने जाणवत होते. भेट वस्तू घेणाऱ्यांनी देखील मनापासून पोलीस ठाण्याचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले. खाकी वर्दीने माणुसकीच्या माध्यमातून गरजूंना केलेली ही मदत लाख मोलाची असल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी देखील पोलीसांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog