माणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगार क्लब आणि मटका माफियांचा धुमाकूळ! तातडीने कारवाई करावी
माणगांव परिसराला अवैध धंद्यांचे ग्रहण
'प्रहार जनशक्ती'चे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांची मागणी
रायगड (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा आणि माणगांव बाजारपेठेत जुगार क्लब आणि मटका माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथे कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे!
ढालघर फाटा येथे अशोक पाटील आणि रमाकांत मोरे, तसेच माणगांव बाजारपेठ येथे भरत शहा आणि हितेन शहा यांचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्यांमुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून माणगांव परिसराला अवैध धंद्यांचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे.
या मटका-जुगाराविरूद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी 'प्रहार जनशक्ती' पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी माणगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रविण पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे यांच्याकडे केली आहे.


Comments
Post a Comment