🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

माणगांव पत्रकार संघ आणि आविष्कार फाऊंडेशनने घडविले माणुसकीचे दर्शन 

कोविडमध्ये योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या पोलीसांना अल्पोपहार 

माणगांव (सचिन पवार) : सामाजिक क्षेत्रात रायगड जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केलेल्या माणगांव तालुका पत्रकार संघ व आविष्कार फाऊंडेशन माणगांव यांनी माणुसकीचे दर्शन घडवित कोविड  संकटात आपली व आपल्या कुटुंबाची चिंता न करता समाजाच्या हितासाठी हाती घेतलेले व्रत याला न्याय देत कोविड संकटात योद्ध्यासारखे रस्त्यावर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना माणगांवात अल्पोपहार व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघ व आविष्कार फाऊंडेशनने घेतलेल्या या छोटेखानी उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विशाल येलवे तसेच पोलीस हवालदार स्वप्नील कदम व सहकाऱ्यांनी पत्रकार संघ व आविष्कार फाऊंडेशनला धन्यवाद देत त्यांचे आभार मानले. 

कोविडच्या वाढत्या संसर्गामध्ये पोलीसवाले हे नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक, आशाताई, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासारखे कोरोना योद्धे म्हणून काम करीत आहेत. पोलीस आपली सेवा बजावताना ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर उतरून काम करीत असतात. कोविड काळातही लॉकडाऊनमुळे रस्त्यावर तासनतास उभे राहून हे पोलीसवाले एप्रिल महिन्याच्या या रखरखत्या उन्हात काम करून जनतेला कोविड संकटात हिताच्या दृष्टीने सूचना देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल उपरोक्त सेवाभावी संघटनांनी घेवून त्यांना रविवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी अल्पोपहार व पाणी बॉटलचे वाटप केले. 

यावेळी राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, प्रसिद्ध उद्योजक विजयशेट मेथा, दिनेश मेथा,    उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते, प्रभाकर मसुरे, सचिन देसाई, आविष्कार फाऊंडेशनचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे गुरुजी, प्रा. हर्षल जोशी, एकता क्रिकेट असोसिएशन माणगांव संस्थापक राहुल दसवते, नंदुराज वाढवळ यांच्यासह पोलीस, वाहतूक पोलीस, महिला पोलीस आदी उपस्थित होते. 


Comments

Popular posts from this blog