पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

रोहा (रविना मालुसरे) : सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रोहेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रायगडच्या पालकमंत्री नामदार अदितीताई तटकरे यांनी आपल्या आमदार निधीतून सुसज्ज रुग्णवाहिका रोहेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे. 

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामीण रुग्णालय रोहा येथे दुपारी १२ वाजता नामदार अदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मधुकर पाटील, विनोद पाशिलकर, विजय मोरे  संतोष पोटफोडे, मयुर दिवेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख व डॉ. अंकिता खैरकर यांनी केले. पालकमंत्र्यांच्या समयसुचकतेबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog