पोस्को महाराष्ट्र स्टीलकडे स्थानिक भूमिपूत्रांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनातील मागण्या अजूनही अपूर्णच!
मागण्या मान्य न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करणार - दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड
कंपनीच्या गेटवर जाऊन निवेदन देऊन दिला इशारा
माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव तालुक्यातील विळे भागाड MIDC क्षेत्रात पोस्को महाराष्ट्र स्टील नावाची (कोरियन मॅनेजमेंट) असलेली कंपनी कार्यरत आहे. ही कंपनी माणगांव तालुक्यात आल्यापासून स्थानिक भूमिपुत्रांनी रोजगार व न्याय-हक्कासाठी वारंवार आंदोलने केली. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळू शकला नाही! दोन वर्षांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आंदोलन केले होते त्यावेळी कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्या आंदोलनातील मनसे सैनिकांची मागणी मान्य न करता कंपनी प्रशासनाने मराठीत पत्रव्यवहार न करता इंग्रजीमध्ये पत्रव्यवहार केल्याने मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी कंपनीच्या गेटसमोर जाऊन कंपनी प्रशासनाला निवेदन देऊन मागण्यांचा उल्लेख केला आहे.
२२ मार्च रोजी दक्षिण रायगड मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या समवेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पेणकर, माणगांव तालुकाध्यक्ष सुबोध जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, अण्णा घाग, मनविसे तालुकाध्यक्ष साईनाथ कुंडे, राजू सुतार, कृष्णा जाधव, मयूर जाधव, केतन डिघे, महेश साळुंके, निलेश येलकर, आदि मनसैनिक व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत देवेंद्र गायकवाड यांनी कंपनीने स्थानिक भूमीपुत्रांना न्याय न दिल्यास दोन वर्षापुर्वीची आंदोलनाची प्रतिकृती करू असे न सांगताच मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येणार असल्याचे उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.