जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान माता व महिला शिक्षकांचा सत्कार
म्हसळा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त म्हसळा तालुक्यातील राजिप शाळा मेंदडी येथे कर्तृत्ववान माता तसेच महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाले निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले.
देशातील आपल्या पराक्रमाचा ठसा उमटविलेल्या थोर महिलांची माहिती देण्यात आली. आपल्या गावात, परीसरातील महिला पदाधिकारी यांचेविषयी देखील माहिती देण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख यांनी सर्व महिला शिक्षकांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले तसेच आजच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अब्बास शेख, गितांजली भाटकर, सायली बीर्जे, मयुरी पाटील, प्रियांका गोसावी, शबाना जलगावकर, अमिना बंरकर व इतर महिला उपस्थित होत्या.