ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या चणेरा विभाग अध्यक्षपदी संतोष देवळे, सरचिटणीसपदी शशिकांत कडू यांची निवड

रोहा (समीर बामुगडे) : ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्रच्या रोहा तालुक्यातील चणेरा विभागाची कार्यकारणी निवडीची बैठक चणेरा येथील कुणबी समाज सभागृहात ओबीसी संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली व रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत चणेरा विभाग अध्यक्षपदी संतोष देवळे व सरचिटणीस पदी शशिकांत कडू यांची निवड करण्यात आली.

यावेळी रोहा तालुका संघर्ष समन्वय समिती उपाध्यक्ष उत्तम नाईक, सरचिटणीस महादेव सरसंबे, सल्लागार हरिश्चंद्र वाजंत्री, तालुका कार्यकारिणी सदस्य उद्देश वाडकर, भातसई विभाग कार्यकारणी सदस्य नवनीत डोलकर, कोळी समाज अध्यक्ष धर्मा कोळी, कुणबी समाज अध्यक्ष अशोक सानप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामचंद्र सकपाळ यांनी ओबीसी समाजाने संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले, सुरेश मगर यांनी ओबीसी समाजाच्या नाही हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. यासह जातिनिहाय जनगणना ही प्रमुख मागणी ओबीसी संघर्ष समन्वय समितीची असल्याचे सांगत ओबीसी संघर्ष समन्वय समिती ची सविस्तर माहिती सांगितली. तर महादेव सरसंबे यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या बैठकीत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या चणेरा विभागाची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष संतोष देवळे, उपाध्यक्ष अशोक ठाकूर, रमाकांत पाटील, प्रमोद जाधव, सरचिटणीस शशिकांत कडू, सहचिटणीस शंकर देवकर, काशिनाथ भोईर, खजिनदार प्रफुल्ल झुरे, सल्लागार एकनाथ मळेकर, विकास तांडेल, बाळाराम भोईर, नरेंद्र सकपाळ, गणेश गावडे, भालचंद्र पाटील, बबन पडवळ, सखाराम  गिजे, पांडुरंग पाटील, कार्यकारणी सदस्य नितीन डबीर, जयराम गायकर, देविदास कांडणेकर गोविंद कोंडे, परशुराम आंब्रे, यशवंत चाळके, मनोहर वाडेकर आदींची निवड करण्यात आली. 

Popular posts from this blog