ओबीसी संघर्ष समितीच्या धाटाव विभागाच्या अध्यक्षपदी अमित मोहिते, तर सरचिटणीसपदी लक्ष्मण मोरे यांची निवड

रोहा (समीर बामुगडे) : ओबीसी संघर्ष समन्वय समिती, ओबीसी जनमोर्चा संलग्न महाराष्ट्रच्या रोहा तालुक्यातील धाटाव विभागाची बैठक ओबीसी संघर्ष समन्वय समिती रोहा तालुका अध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत  रोहा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत धाटाव विभागाच्या अध्यक्षपदी अमित मोहिते यांची तर सरचिटणीसपदी लक्ष्मण मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या बैठकीस रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे, चिटणीस महेश बामुगडे, अरविंद मगर, चंद्रकांत भगत, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुरेश मगर यांनी ओबीसी समाजाच्या विविध मागण्या व कार्यपद्धती यासंदर्भात माहिती दिली. तर मधुकर पाटील यांनी ओबीसी समाजाने संघटित होऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

या बैठकीत घाटाव विभाग संघर्ष समन्वय समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारणी निवड चे निरीक्षक म्हणून महादेव सरसंबे यांनी काम पाहिले. नूतन जाहीर झालेल्या या कार्यकरणीमध्ये अध्यक्ष अमित मोहिते, उपाध्यक्ष रमेश रावकर, रामाशेठ म्हात्रे, लक्ष्मण जंगम, संदेश मोरे, सरचिटणीस लक्ष्मण मोरे, खजिनदार हरिचंद्र मोरे, सहचिटणीस किशोर रटाटे, अनिल बामुगडे, राजू सुतार, विलास भगत, राकेश गुरव, सल्लागार लीलाधर पांडूरंग मोरे, अनिल भगत, विष्णू लोखंडे, ज्ञानेश्वर साळुंखे, दत्ता चव्हाण, यशवंत रटाटे, सदानंद पडवळ, हरिश्चंद्र माने, रमेश हरी मोरे, रमेश विठ्ठल मोरे, अमित घाग, कार्यकारणी सदस्य सतीश भगत, जयवंत घरत, चंद्रकांत भगत, मयूर मुंढे, प्रशांत बर्डे, सचिन पवार, गणेश रटाटे, नरेश कोकरे, तुकाराम भगत आदींची निवड करण्यात आली आहे.

Popular posts from this blog