बोर्लीपंचतन येथे लवकरच जीओचे नेटवर्क

टॉवर उभारणीसाठी ग्रामपंचायतीला दिले पत्र

बोर्लीपंचतन (मुज्जफर अलवारे) : बोर्लीपंचतन येथे गेले काही वर्षापासुन वोडाफोन, आयडीया व बीएसएनएल यांच्या सुमार नेटवर्क सेवेमुळे ग्राहकांना खुपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रारी, आंदोलन करुन त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे रीलायन्स कंपनीच्या जीओचे नेटवर्क आपल्या विभागात कधी येईल याची प्रतिक्षा लोकांना होती. पण आता यासाठी फार काळ वाट बघावी लागणार नाही कारण बोर्लीपंचतन येथे लवकरच जीओ नेटवर्कचे काम सुरु होत असुन त्यासाठी लागणाऱ्या ऑप्टीकल फायफर केबलचे काम प्रगतीपथावर असून बोर्लीपंचतन येथे जीओ नेटवर्क कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी समिट डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीच्या वतीने बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडे नाहरकत परवानगीसाठी पत्र देण्यात आले असुन सर्व कायदेशीर बाजुंचा विचार करुन ग्रामपंचायतीकडुन लवकरच टॉवरच्या उभारणीला रीतसर संमती मिळेल व पंचक्रोशीतील नागरीकांना लवकरच चांगल्या दर्जाचे नेटवर्क उपलब्ध होईल अशी आशा आहे.

  आता जीओचा नवीन टॉवर केव्हा कार्यान्वयीत होणार याचीच उत्सुकता बोर्ली पंचक्रोशीतील नागरीकांना लागली आहे.तरी ग्रामपंचायतीने यासाठी विनाकारण विलंब न लावता शासनाच्या असणाऱ्या नियम व अटींना अधीन राहुन टॉवर उभारण्यास परवानगी देउन गेले दोन तिन वर्षे नागरीकांना भेडसावणारा सुमार नेटवर्क सेवेचा प्रश्न मार्गी लावावा अशा आपल्या भावना नागरीकांनी आमच्या प्रतीनिधीजवळ व्यक्त केल्या.

Popular posts from this blog