विकासकामांची वर्क ऑर्डर थेट ठेकेदाराच्या हाती, पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदारासाठी लाॅबिंग

तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यात 25 ग्रामपंचायती असून जुन 2020 मधील चक्रीवादळात बहुतेक रा.जि.प शाळांची दुरावस्था झालेली आहे. या सर्व शाळांची डागडुजी करण्यासाठी शासन स्तरावर निधी मंजुर झालेला आहे. शासनाच्या नियमानुसार कामांमध्ये पारदर्शकता आणि कामाचा दर्जा अपेक्षित आहे. त्यासाठी पंचायत समिती ग्रामपंचायत यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. परंतु तळा तालुक्यात मंजुर झालेल्या विकासकामांंचे पत्र ग्रामपंचायत ऐवजी थेट ठेकेदाराच्या हाती पदाधिकारयांकडुन सोपवली जात आहेत. शासनाने मंजुर केलेले काम किंंवा त्या कामाची वर्क आॅर्डर ग्रामपंचायतींऐवजी ठेकेदाराच्या हाती देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी ठेकेदाराला काम देण्याची शिफारस करणे हे संविधानानुसार बेकायदेशीर आहे. त्याची शिक्षा ही थेट पद रद्दची आहे. कोणताही ठेका निविदा पध्दतीने काढला जावा अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरांवर ठेकेदार नेमताना सोयीने खेळ केला जातो. बहुतांश ठेकेदारही एकमेकांना सामिल असतात सारे ठरवुन कामे वाटुन घेतात कोणी कोणती कामे घ्यायची कीतीची निविदा भरायची हे ही ठरलेले असते. ही पध्दत मोडीत काढणे कठीण आहे.मात्र पदाधिकारयांनी मर्जितील ठेकेदारांचे लाॅबिंग करावे ते ही प्रत्येक वर्क आॅर्डर च्या मागे ठेकेदाराचे नाव लिहुन लेखीटाकी करावे हे धक्कादायकच. 

धक्कादायक प्रकार तळा तालुक्यात घडत आहे. या पध्दतीमुळे ग्रामपंचायतीतील सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांना मंजुर झालेल्या कामांची कल्पनाच नसते. शासन स्तरावर निधी मंजुर होत असला तरी गावातील हे काम माझ्या पक्षानेच मंजुर करुुन आणले असुन ते मीच करणार असा दावा गावातील गाव पुुुुढारी करु लागले आहेत.

तळा पंचायत समितीच्या डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात दि. (4 मार्च) रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरपंचांनी मंजुर झालेल्या कामांची वर्क आॅर्डर सरपंच आणि ग्रामसेवक यांना विश्वासात न घेता थेट ठेकेदाराच्या हाती देण्यात येत असल्याची तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. व्ही. यादव यांच्याकडे केली आहे. याबाबतीत पंचायत समिती कोणती कार्यवाही करते याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष लागुन आहे. रायगड जिल्हा परिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी डाॅ.किरण पाटील यांनी या गंभीर प्रकाराकडे त्वरित लक्ष घालुन पदाधिकारी आणि ठेकेदारां बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी तळेवासीयांकडून होत आहे.

Popular posts from this blog