माणगांवमध्ये जमिनीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी


माणगांव (उत्तम तांबे) : जमिनीच्या वादातून तीन जणांनी घराच्या दरवाज्याचा कडी कोंयंडा तोडून एकाला मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना माणगांव तालुक्यातील निलगुन येथे घडली. माणगांव पोलीस ठाणे हद्दीतील निलगुण येथील फिर्यादी हे घरात पत्नी व मुलासह जेवण करीत असताना जुन्या जमिनीच्या वादावरून यांतील आरोपी क्रमांक एक ते तीन (रा. निलगुण, ता. माणगांव) यांतील आरोपी क्रमांक एक याने दरवाजावर लाथ मारून दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात घुसून फिर्यादी व जखमी क्रमांक २ यांना हाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आरोपी क्र. १ व २  यांनी घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी क्रमांक १ याने साक्षीदार यांचे घरात घुसून जखमी क्रमांक १ यांना घराच्या कौलाने डोक्याला व उजव्या हाताला मारून दुखापत केली याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular posts from this blog