🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

भाजपचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. मनोज पाथरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश 

तळा (संजय रिकामे) : तळा नगरपंचायतीच्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पूर्वतयारीला लागली असून भाजपचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. मनोज पाथरे यांनी महाड-पोलााापूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मुख्य उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, विभाग प्रमुख दिपक चिंचाळकर, लिलाधर खातु, नमित पांढरकामे, गुरूदास तळकर व तमाम शिवसैनिक  उपस्थितीत होते. 

नगरपंचायत निवडणुकीपूर्वी भाजप पक्षाचा अनुभवी कार्यकर्ता सेनेच्या गळाला लागला आहे. डाॅ. पाथरे यांंनी भाजप पक्षाची मुहूर्तमेढ तळा तालुक्यात रोवली होती. मागील पाच वर्षे राज्यात एक हाती सत्ता असताना विकासकामांची मागणी केलेली असताना एकही काम भाजपाने केले नाही. निवेदनांना फक्त वाटाण्याच्या अक्षदा दिल्या. शिवसेनेचा विकास कामाचा झंझावात व तळा शहरासाठी नियोजित पाणी पुरवठा योजना महत्त्वाच्या विकासावर प्रभावीत होऊन आमदार भरतशेठ गोगावले व जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे अशी प्रतिक्रीया डाॅ. पाथरे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog