आदिवासी तरुण दिलीपच्या बेहद धाडसामुळे वाचले राजीवचे प्राण.!
विजयराव मोरे यांच्याकडून तरुणाचा ‘सन्मान’
रोहा (रविना मालुसरे) : रोह्यात मुंबईहुन बाहे गावी आपल्या मित्राकडे सहलीसाठी आलेले मित्र कुंडलिका नदी पात्रात बुडाले व एकजण बचावल्याची घटना काही दिवसा पूर्वी घडली होती. दरम्यान मोठ्या विश्वास आणि जिद्दीने आपल्यापेक्षा दुप्पट वजनदार युवकाला पाण्याच्या जोरदार प्रवाहात पकडले. अत्यंत चपळाईने त्या तरुणाला काठावर आणले. त्याचे जीव वाचविन्यात बारसोली आदिवासी वाडीतील दिलीप वाघमारे या बांधवाला यश आले. मात्र दिलिपच्या धाडसाचे सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे यांनी कौतुक करित रोख रक्कम देऊन त्याचा यथोचित सन्मान केला.शनिवार दि. २० रोजी घडलेल्या या चित्तथरारक घटनेचा साक्षीदार असलेल्या दिलीप वाघमारेने पाण्याच्या भोवऱ्यात अडककेल्या राजीव हरीश्चचंद्र घोसाळकर (३७) रा. काळाचौकी (मुंबई) या युवकाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने बाहेर काढले. मात्र इतर दोघांना वाचविण्यात दुर्दैवाने त्याला अपयश आले. आंबराई मधे काम करणाऱ्या वाघमारे याच्या याच धाडसाची अनेकांनी अक्षरशः कौतुक, प्रशंसा केली.राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे यांनी रोख रक्कम देउन मदतीचा हात देत कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते त्याचा यथोचीत सन्मान करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ आप्पा देशमुख,रायगड प्रेस क्लब उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, उद्योजक राकेश मोरे यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
याठिकाणी पाण्याचा ओघ मोठा असतानाही त्या युवकाला वाचवून मलाही खुप आनंद झाला अशी प्रतिक्रिया दिलीप वाघमारे यांनी दिली. मात्र स्वतःचे जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचविणाऱ्या बहाद्दर तरुणाचा शासन, प्रशासन पातळीवर सन्मान व्हावा अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.