प्रगती गारमेंट युनिटचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न

तळा (संजय रिकामे) : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रायगड अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, नियोजन विभाग यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण  योजनेंतर्गत कर्जत येथील प्रगती गारमेंट युनिटचे उद्घाटन राज्यमंत्री उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. 
यावेळी कर्जत- खालापूर चे आमदार श्री. महेंद्रशेठ थोरवे, कर्जतच्या नगराध्यक्षा श्रीमती सुवर्णाताई जोशी, कोकण विभागाचे उपजीविका विकास अधिकारी हेमंत पाटील, रायगड महिला आर्थिक विकास महामंडळच्या जिल्हा समन्वयक वर्षा पाटील आणि सीएमआरसी स्टाफ, जिल्हा स्टाफ, कार्यकारिणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या युनिटसाठी शासकीय जागा देण्याचे आश्वासनही दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक वर्षा पाटील यांनी केले तर सीएमआरसी मॅनेजर पद्मावती गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog