श्रीवर्धन तालुक्यासाठी फिरत्या पशू वैद्यकीय दवाखान्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
तळा (संजय रिकामे) : महाराष्ट्र शासन व पशूसंवर्धन विभागाच्या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री पशूसंवर्धन योजनेतून श्रीवर्धन तालुक्यासाठी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला असून याचे उद्घाटन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते दि. 26 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, पं. स. सदस्या श्रीमती प्रगती अदावडे, पं. स. सदस्य मंगेश कोबनक, सरपंच सौ. नम्रता गावणेकर, उपसरपंच श्री. प्रकाश तोंडलेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आरले, प्रांताधिकारी श्री. अमित शेडगे, तहसिलदार श्री. सचिन गोसावी तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्यात आजारी पशू रुग्णांवर शेतकऱ्यांच्या दारात उपचाराची सुविधा, रोगप्रतिबंधक लसीकरण, उच्च उत्पादक क्षमता असणाऱ्या वळूंचा रे हमात्रा वापरून कृत्रिम रेतन, पशू आहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशू वैद्यकामार्फत मार्गदर्शन शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती इत्यादी सेवा व सुविधा उपलब्ध असणार आहेत. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी फिरत्या दवाखान्याच्या रुग्णवाहिकेची व त्यातील औषधांचीही पाहणी केली.