साईमध्ये बहुजन क्रांती मोर्चातर्फे शिवजयंती साजरी 


साई/माणगांव (हरेश मोरे) : साईमधील अॅड. हारुन सोलकर हायस्कूल मध्ये बहुजन क्रांती मोर्चा तर्फे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून कार्यक्रमाचे उद्घाटन साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेन ईस्माइल रहाटविलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी साई सरपंच हुसेन राहाटविलकर, राष्ट्रीय प्रभारी बहुजन क्रांती मोर्चा (नवी दिल्ली) कुमार काळे, माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे, माजी सभापती गजानन अधिकारी, जमातुल मुस्लिमीन साई अध्यक्ष इब्राहीम जुवले, साई मराठा समाज अध्यक्ष गोविंद अधिकारी, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष लियाकत राऊत, माणगांव बौद्ध पं.स. उपाध्यक्ष विठोबा मोरे, खैरेवाडी अध्यक्ष प्रकाश धुमाळ , साई ग्रामपंचायत माजी उपसरपंच आनिस सोलकर, रायगड राष्ट्रीय किसान मोर्चा संयोजक गफार रहाटविलकर, साई आदिवासी समाजाचे अध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा माणगांव अध्यक्ष रिदवान जलगावकर, सैफुल्ला जलगावकर, गणेश पवार, प्रशांत अधिकारी, प्रवीण अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असे आज्ञापत्र काढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात कृषी विषयक काळे कायदे आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र केले जात आहे. तसेच ओबीसींची जाती आधारित जनगणना न करता NPR, CAA आणि NRIC ला राष्ट्रीय जनगणने सोबत जोडले जाऊ शकते. असे केल्यास ओबीसी म्हणजे कुणबी, आगरी ,कोळी ,माळी व मराठा यांचे भविष्यात शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक नुकसान होऊ शकते.त्याचबरोबर EVM हटाव देश बचाव. जर समाजाला घडवायचे असेल तर पहिले इतिहास शिकण गरजेचे आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवर राष्ट्रीय प्रभारी बहुजन क्रांती मोर्चाचे कुमार काळे यांनी उपास्थितांना समजावून सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष मौलाना कासिम सोलकर, राष्ट्रीय मू्लनिवासी महिला संघ अध्यक्षा उमा तारू, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम सावंत, यांनीही उपास्थितांना मोर्चाचे महत्व पटवून देत शेतकऱ्यांच्या मागण्यांना दुजोरा दिला.
माणगाव पंचायत समिती माजी सभापती सुजित शिंदे, गजानन अधिकारी, यांनी शिवरायांनी जाती भेद न करिता सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित करुन स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या सभासदांमध्ये ३५ टक्के मुस्लिम बांधवांचा सहभाग होता. शिवरायांच्या निकटवर्तीयांमध्ये मुस्लिम बांधव जास्त जवळ होते. परंतु आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये हिंदू-मुस्लिम हे वेगवेगळे आहेत ही भावना त्यावेळी जागृत करीत मनामध्ये मतभेद निर्माण केला. अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मत पटवून शिवरायांच्या जयंती निमित्त दिले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. जयेश पवार, कासे सर, राकेश मोरे, अब्रार सोलकर, राम सावंत, मिलिंद साळवी व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. 

Popular posts from this blog