माणगांव पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे आदिवासी मुला-मुलींना ऑनलाईन मार्गदर्शन


माणगांव (उत्तम तांबे) : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व विकास दीप संस्था, अमरदीप संस्था आणि सेंटर फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी माणगांव येथील सर्व विकास दीप या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या बाल सभेतील मुला-मुलींना माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी "बालकांचे हक्क" या विषयावर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. सदर बालसभेत माणगांव तालुक्यातील सुमारे १९ आदिवासी वाड्यांतील १० ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. बाल सभेतील आदिवासी समाजातील या मुला-मुलींना माणगांव पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी शिक्षणाचे महत्व, पोलीस भरती आणि अन्याय व अत्याचार विरोधात आपल्याला कायदेशीर मदत कशी मिळवता येते यासंदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. 


या बालसभेतील मुला-मुलींनी आपल्या मनातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मुलांना समजेल अशा सहज आणि सोप्या भाषेत देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular posts from this blog