🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

ज्येष्ठ पत्रकार नारायणराव मेकडे यांचे दुःखद निधन


तळा (संजय रिकामे) : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा काँग्रेसचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते तळा तालुक्यातील नारायणराव मेकडे यांचे शुक्रवारी सांयकाळी डोंबिवली येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. नारायणराव मेकडे काँग्रेसचे गांधीवादी चळवळीचे पाईक होते. जवळपास पन्नास वर्षे पत्रकारिता व कोर्ट कचेरीतील किंवा इतर सरकारी अर्ज किंवा स्टॅम्प पेपरवर केले जाणारे काम असा त्यांचा व्यवसाय होता. स्टँम्प रायटर म्हणून ते प्रसिद्ध होते. मराठी पत्रकार संघाचे सदस्य होते. जुन्या पिढीतील काँग्रेसचा अत्यंत निस्सीम भक्त आणि सचोटीचा कार्यकर्ता कसा असेल तर ते नारायणराव होते. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बॅ. ए. आर. अंतुले यांचे समर्थक होते. पक्ष बदलू धोरण त्यांनी कधीच स्वीकारले नाही. महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या दलित मित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य होते. जिल्हा पत्रकार संघाच्या रायगड पत्रभूषण या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. नारायणराव मेकडे आज अनंतात विलीन झाले. त्यांंच्या निधनाने तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही. नारायणराव मेकडे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांना सर्वच स्तरांतील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments

Popular posts from this blog