'न्यूज २४ तास मराठी'च्या वृत्ताची दखल! 

पाटणूसच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती वैद्यकीय अधिकारी रूजू, ग्रामस्थ घेत आहेत वैद्यकीय सेवेचा लाभ!

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस येथील आरोग्य केंद्राची इमारत जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात पूर्ण उध्वस्त झाली होती. त्यामुळे पाटणूसच्या ग्रामस्थांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येत नव्हता. इमारत उध्वस्त झाल्याचे वृत्त 'न्यूज २४ तास मराठी' च्या माध्यमातून प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत इमारत दुरूस्त करून पूर्ववत केली. शिवाय या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश केलास्कर यांची नियुक्ती केली. 

हे अधिकारी नियमितपणे आरोग्य केंद्रात उपस्थित राहून रूग्णांची सेवा करीत आहेत. पाटणूस पंचक्रोशितील ग्रामस्थ या वैद्यकीय सेवेचा लाभ घेत असून ग्रामस्थ आरोग्य सेवेच्या प्रति समाधान व्यक्त करीत असून ग्रामस्थ आरोग्य प्रशासनाला धन्यवाद देत आहेत. 

पाटणूस पंचक्रोशितील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन आपल्या आरोग्यविषयक काही अडचणी असतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घ्यावी व वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटणूसच्या सरपंच निलीमा निगडे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Popular posts from this blog