महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग समाज उत्कर्ष संस्थेची पाली येथे सभा संपन्न

रायगड (भिवा पवार) : महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग संस्थेची महाराष्ट्रातील सातही जिल्ह्यांतील ठाकूर-ठाकर नोकवर्गाच्या उपस्थितीत २४ जानेवारी २०२१ रोजी सुधागड पाली येथे ठाकूर समाज भवन येथे  सभा संपन्न झाली. 

रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती असलेले प्रसिद्ध तिर्थक्षेत्र सुधागड पाली येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य ठाकूर-ठाकर नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेच्या मिटींगमध्ये बोगस आदिवासींना रोखण्यासाठी उपाय योजून संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला-सभासदाला जबाबदाऱ्या देऊन महाराष्ट्र राज्यातील आठही जात पडताळणी कार्यालयास वारंवार बोगस घुसखोरी संदर्भात भेटी देणे, समितींना पत्रव्यवहार करणे, बोगसांविरुद्ध रेकॉर्ड काढून ठेवणे, पुराव्यांच्या प्रिंट काढून जवळ ठेवणे, बोगस लोकांना बोगस ठरविणारे आवश्यक कागदपत्र-पुरावे जमविणे, सर्वे करणे, टायपिंगचे काम करणे, RTI टाकणे अशा अनेक कामांची विभागणी/वाटणी प्रत्येक जिल्हा नोकरवर्ग कमिटीला, तालुका नोकरवर्गाला वाटून देण्यात आली आहेत. 

तसेच बोगस खूसखोरी रोखण्यासाठी प्रत्येकांनी जनजागृती करून आपल्या निदर्शनात आलेल्या बोगसांची आपल्या स्तरावरून माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन संबधित महाराष्ट्र राज्य ठाकूर-ठाकर नोकरवर्ग पदाधिकाऱ्यांना कळविण्याचे सांगण्यात आले. आज पर्यंत ठाणे, अमरावती, नंदूरबार, नागपूर येथील पडताळणी समिती मधील २५ बोगस घुसखोरांना हेरिंगच्या वेळी पुरावे अभावी जात पडताळणी मिळण्यापासून रोखण्यात महाराष्ट्र राज्य ठाकूर-ठाकर नोकरवर्ग संस्थेला यश आले आहे.

बोगसांनी आजपर्यंत आपल्या हक्काच्या महत्वाच्या पदाच्या नोकऱ्या/जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे आपल्या बऱ्याच खऱ्या सुशिक्षित तरूणांवर बेरोजगाराची वेळ आली आहे. त्यामुळे बोगसांना रोखण्यासाठी सर्व नोकरदारांनी, समाज सेवकांनी, प्रतिनिधी तन-मन- धनाने नोकरवर्ग संस्थेला मदत करून बोगसांना रोखण्यासाठी आपण राज्य संस्थेच्या वतीने जात पडताळणी समितीला पुराव्यानिशी उपस्थित राहून बोगसांना वेळीच रोखण्याचे आवाहन उपस्थितांना महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग संस्थेचे अध्यक्ष अरूण खाकर यांनी केले. 

यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष अरूण खाकर, उपाध्यक्ष शिवाजी मेंगाळ, उपाध्यक्ष विठ्ठल उघडे, सचिव कांताराम खंडवी, खजिनदार गणेश पारधी, सहसचिव उत्तम डोके, सह खजिनदार गंगाराम बांगारा, नवनाथ उघडे, प्रकाश उघडे, यशवंत हंबीर, मालू निरगुडे, नवसु रेरा, कृष्णा पिंगळा, जोमा दरवडा, वायके वारगुडे, जोमा निरगुडे, भला साहेब, पिंगळे साहेब आदिंसह महाराष्ट्रातील आठही जिल्ह्यांतील आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग उपस्थित होते.

Popular posts from this blog