साप्ताहिक रोहा टाइम्स दिनदर्शिकेचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या हस्ते प्रकाशन
रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक रोहा टाइम्स दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या शुभहस्ते पोलीस स्टेशन (दालन) कार्यालयात संपन्न झाला. यावेळी रोहा टाइम्सचे मालक-संपादक मनोज अनंतराव घोसाळकर, व्यवस्थापकीय संपादक शैलेश गावंड, पत्रकार सागर जैन, नारायण खुळे, नंदकुमार बामुगडे, गुमान सिंह सोलंकी, समीर बामुगडे, छायाचित्रकार कुणाल घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमात पोलीस निरिक्षक नामदेव बंडगर म्हणाले की,"रोहा टाइम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन माझ्या हस्ते केलेत त्याबद्दल मी तुमचे खूप-खूप आभारी आहे.आयुष्यात आपल्याला रोहा पोलीस स्टेशन मार्फत कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागले तर रोहा पोलीस स्टेशन आपल्याला नेहमी सहकार्य करेल. असेच प्रेम आमच्यावर ठेवा, पोलीस स्टेशनवर ठेवा".
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहा टाइम्स व्यवस्थापकीय संपादक शैलेश गावंड यांनी केले. मनोगत रोहा टाइम्स मालक संपादक मनोज अनंतराव घोसाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार सागर जैन यांनी केले. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात रोहा टाइम्स दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.