व्ही-मार्ट सुपर मार्केटचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते होणार शुभारंभ 

माणगांवमध्ये मराठी उद्योजकाची गगनभरारी 

माणगांव (राजन पाटील) : मराठी माणूस उद्योगधंदा करण्यात कमी पडतो अशी सततची टिका होत असते पण या टिकेला छेद देत आपल्या स्वकर्तृत्वावर माणगांवमधील जनतेच्या सेवेकरिता व्ही-मार्ट सुपर मार्केटची उभारणी करण्याचा मनोदय मराठी उद्योजक श्री. दिपकशेठ जाधव यांनी माणगांव एस.टी. स्टँड जवळ ५ हजार स्क्वेअरफूट जागेत व्ही. एम. सुपर मार्केट सुरू करण्याचे धाडस दाखविले आहे. अर्थात या सुपर मार्केटद्वारे जनतेची गैरसोय दूर व्हावी, चांगली सेवा मिळावी व चांगल्या दर्जाचा किराणा माल, गृहोपयोगी वस्तू माणगांवमधील जनतेला कमीत कमी भावात मिळाव्या जेणेकरून माणगांवमधील जनतेची सेवा होईल असा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्ही-मार्ट सुपर मार्केटची उभारणी केली आहे असे मत या सुपर मार्केटचे मालक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. दिपकशेठ जाधव यांनी व्यक्त केले आहे. 

या व्ही-मार्ट सुपर मार्केटचे भव्य उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे (विधानपरिषद) यांच्या उपस्थितीत रायगडचे खासदार श्री. सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते रविवार दि. २४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. 

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश रा. काँ. पार्टीचे सरचिटणीस प्रभाकरदादा उभारे, रा. काँ. रायगड उपाध्यक्ष शेखरशेठ देशमुख, माजी जि. प. सदस्य अॅड. राजीव साबळे, माणगांव तालुका रा. काँ. अध्यक्ष सुभाष केकाणे, माणगांव नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माणगांव मनसेचे तालुकाध्यक्ष सुबोध जाधव, माणगांव पं. स. सभापती अलका जाधव, माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, उद्योजक रामदास गोवारी, पं. सं. सदस्य शैलेश भोनकर, माणगांव तालुका महिला रा. काँ. अध्यक्षा संगिता बक्कम, उपाध्यक्षा श्रद्धा यादव, उद्योजक विलास जैन, तलाठी मारूती चाटे, उद्योजक विकेश जैन, मराठी उद्योजक श्री. सुभाषशेठ दळवी, महाड-माणगांव-पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे रा. काँ. अध्यक्ष श्री. बाबूशेठ खानविलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

तरी या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक मराठी उद्योजक दिपकशेठ जाधव, भागवत चाटे, बळीराम गोवारी, प्रशांत कामते, विलास येलकर, रूषिकेश जैन, यांनी केले आहे.

Popular posts from this blog